Agriculture

कापसावरील मावा नियंत्रन

मावा

🔴मावा या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपावस्थेत आणि शेवटच्या अवस्थेत आढळतो. 

🔵 कोरडवाहू कपाशीवर सर्वसाधारणपणे जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून सुरू होतो. 

⚫सर्वात जास्त प्रादुर्भाव जुलैचा शेवटचा आठवडा ते ऑगस्टचा दुसरा आठवडा आणि पिकाच्या शेवटी डिसेंबर – जानेवारी महिन्यात आढळून येतो. 

🔘रिमझिम पाऊस आणि अधिक आर्द्रता या किडीच्या वाढीला पोषक असते. परंतु जोराचा पाऊस झाल्यास त्यांची संख्या कमी होते. 

🔴 माव्याची प्रौढ व पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर समूहाने राहून त्यातील रस शोषण करतात. अशी पाने आकसतात व मुरगळतात. त्यामुळे झाडाची वाढ खुंटते. 

⚫याशिवाय माव्याने शरीरातून बाहेर टाकलेल्या चिकट गोड द्रवामुळे बुरशीची वाढ होऊन पाने काळसर होतात. 

🔵पिकाच्या शेवटच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास कापसाची बोंडे चांगली उमलत नाहीत. तसेच काही विषाणूंचा प्रसार माव्यामार्फत केला जातो. 

माव्यावर रासायनिक नियंत्रन

थायामेथाँक्झाम 12.6%+लँम्बडा साँयहँलोथ्रिन(आलीका/सिजेंटा)

किंवा

थायामेथाँक्झाम 25%wp(अ्क्टारा/सिजेंटा)

🏹यापैकी कोनत्याही फवारनीमुळे मावा नियंत्रनात येउ शकतो

♦️याशिवाय तुडतूडे ,पाढरी माशी,फुलकिडे यावरही नियंत्रन मिळवता येते.

About the author

Sachin

Hay my name is sachin this is my blog allcustomersupport.in please support us YouTube Instagram Facebook Twitter blogger WordPress tips &, tricks

Thank you

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.