Agriculture

बोंडआळीवर उपाय/बोंडआळी नियंत्रन

कापूस-बोंडआळीवर नियंत्रन🐛

👉1)कापूस या पिकावर अळी पडण्याचा कालावधी हा ठरलेला असतो, आणि तो म्हणजे अमावस्या सर्व सजीव श्रुष्टीचा मीलन आणि फलन काळ हा अमावस्या असतो, प्रत्येक महिन्याच्या अमावाश्येला एक दोन दिवस मागे पुढे, म्हणजे महिन्याच्या ज्या 4/5 काळ्याकुट्ट रात्री असतात, त्या रात्री अळीचे पतंग अंडी घालतात.

👉2)हि अंडी पिकांच्या लुसलुशीत पानावर ,पातीच्या देठावर घालतात, हि अंडी साधारणतः 48 ते 72 तासात उबवतात
{ते तापमानावर अवलंबुन असते, तापमान कमी असेल ,तर 4 दिवसात हि उबवतात}
त्यातून अतिशय सूक्ष्म अळी जन्माला येते ती साध्या डोळ्यांनी दिसत नाही इतकी सूक्ष्म असते.

👉3)ती प्रथम फुलात जाते व एक दोन दिवसांनी फुलांच्या पाकळ्या आतून वाळतात फुलांचा रंग फिकट जांभळट होतो , तीच डोमकली तयार होते. 2/4 दिवसात हि अळी फुलांच्या आत असलेल्या लहान कैरीच्या आत जाते.

👉4)कैरीच्या आत गेल्यावर तिची संपूर्ण अवस्था तेथेच पूर्ण होते, अली ज्या मार्गाने कैरी गेलेली असते तो मार्ग कैरीच्या वाढीमुळे बंद होतो व आपल्याला माहिती पडत नाही की कैरीत अळी आहे ते.

👉5)म्हणूनच या अळी ला कोणतेही किडनाशक मारू शकत नाही, तुम्ही ती कैरी रात्रभर किळनाशकात बुडवून ठेवली आणि दुसऱ्या दिवशी फोडून पहिली तरी ,ती जीवन्त सापडेल. या सेंद्री अळीचे आयुर्मान 35 दिवसाचे असू शकते.

👉6)आपण ह्या अळीला मारू शकत नाही, हिच्यावर नियंत्रण करायचे असेल तर , *अमावस्येच्या 2 दिवसांनी अंडीनाशक फवारणी करणे, किंवा ती अति सूक्ष्म अवस्थेत पण कैरीच्या आत जाण्याच्या अगोदरच अळी नाशक फवारा मारू शकता.

 अळी कैरीत गेल्यामुळे आपण तिला मारू शकत नाही, आपल्या हातात फक्त अंडी नासवणे आणि प्राथमिक अवस्तेतील अळी मारणे हेच उपाय शिल्लक राहतात.

बोंडआळीवर ऊपाय🐛

अमावस्ये नंतर चे 4 दिवस त्यासाठी महत्वाचे असतात, आणि या 4 दिवसात जर आपण योग्य ती आणि योग्य प्रमाणात किळनाशक फवारणी केली तर 80-90% सेंद्री बोंंडअळी चे नियंत्रण करू शकतो.

अमावस्येच्या 2 दिवसांनी खालील फवारणी करावी. प्रमाण 15 लिटर पाण्यासाठी आहे

 

ऊपाय💉

बोंंडआळीचा बंदोबस्त

{1} थोयोडीकार्ब 20 ग्रॅम ,नीम अर्क 20% 30 मिली ,स्प्रे + 2 मिली, प्रोफेनोफॉस 30 मिली.

{2} इमामेकटींन बेंझोइत 8 ग्रॅम, DDVP 30 मिली, निमार्क 20% 30 मिली,स्प्रे + 2 मिली.

{3} प्रोफेनोफॉस 35 मिली, deltamethrin 20 मिली , नीम अर्क 20 % 30 मिली, स्प्रे + 2 मिली.

वरील प्रमाणे अमावस्ये नंतर 1 फवारा मारल्यावर 5 ते 7 दिवसांनी.

{1} थोयोडी कार्ब 30 ग्रॅम, क्लोरो 50% 35 मिली, नीम अस्त्र 20% 30 मिली ,स्प्रे + 2 मिली.

{2} डेल्टा मेथ्रीन 20 मिली , DDVP 30 मिली, नीम अर्क 20% 30 मिली, स्प्रे + 2 मिली

{3} डायपेल 50 ते 60 मिली, नाराणास्त्र 10 मिली,निमास्त्रा 20% 30 मिली, स्प्रे + 2 मिली.

(कोणत्याही परिस्थितीत प्रोफेनोफॉस, क्लोरोपायरीफॉस, लगातार 2 वेळा फवारू नका त्यामुळे कापूस पिकाची पानगळ होते.* हा अनुभव आहे.)

 

🌱या फवारनीमुळे काय होईल🌱

प्रोफेनोफॉस अळी व अंडी नाशक असल्यामुळे प्राथमिक अवस्तेतील अळी मरेल अंडी नासल्यामुळे अळी अंड्यातून बाहेर येणार नाही.

नीम अर्कात ऍझोडीरेकटींन हा घटक अंडी नाशक आहे, अंडी नासतील , नीम अर्काचा तीव्र कडू वासा मूळे पतंग अंडी आपल्या शेतात घालणार नाहीत ,भुकेने व्याकुळ होऊन अली मरेल. स्प्रे + हे अत्यन्त पॉवर फुल पेनेट्रेट होणारे सिलिकॉन स्प्रेडर आहे , पानावर 1 थेंब जरी किलनाशक पडले तरी ते संपूर्ण पानात भिनले जाईल, इमामेकटींन, थोयोडी कर्ब, हे जहाल विष आहे अळीचा खात्मा होईल.

सिन्थेटिक पायरेथ्रीड औषधाचा, वापर केल्यामुळे पिकाला शॉक बसतो, तसेच चिकटा पडू शकतो, व पांढऱ्या माशीचे प्रमाण वाढू शकते. ती मारल्यानंतर एखादे टाँनीक ची फवारणी आवस्यक असते.

(कापसावरील ईतर रोगनियंत्रनhttps://bit.ly/2OjwgQZ)

 आमावस्ये नंतर हे 2 फवारे मारल्या नंतर 15/20 दिवस फवारणी करावी लागणार नाही, पण तो पर्यंत *पुढची आमावस्या येईल, मग पुन्हा वरील प्रमाणेच करावे लागेल.

About the author

Sachin

Hay my name is sachin this is my blog allcustomersupport.in please support us YouTube Instagram Facebook Twitter blogger WordPress tips &, tricks

Thank you

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.