Agriculture

सिजेंटा आँक्टारा/थायामेथाँक्झाम 25%WG

थायामेथॉक्झाम २५ % डब्ल्यू जी

अँक्टारा २५ डब्ल्यू जी । ( रोगनिवारणाचा विस्तृत आवाका असलेले सर्वागीण कीटकनाशक )

थायामेथॉक्झाम २५ % डब्ल्यू जी ( अँँक्टारा २५ डब्ल्यू जी ) हे रोग निवारणाचा विस्तृत आवाका असलेले सर्वांगीण कीटकनाशक असून त्याची स्पर्शसंपर्क क्रिया व पोटातील क्रिया जलद घडून येते . तांदळावरील प्लान्टहॉपर , ( तपकिरी रंगाचा झाडावर उड्या मारणारा किडा ) , व्हाइट बॅक्ड प्लान्ट हॉपर ( पांढ – या पाठीचा झाडावर उड्या मारणारा किडा ) . ग्रीन लीफ हॉपर ( हिरवा पानांवरील किडा ) , स्टेम बोअरर ( खोडपखया ) , गाल मिज , लीफ फोल्डर ( पानांची गुंडाळी करणारा किडा ) व फुलकिडे .

कपाशीवरील मावा , तुडतुडे , फुलकिडे व पांढ – या माशा यांच्यावर नियंत्रण तेवण्यासाठी याची शिफारस करण्यात येते . आंब्यावरील हॉर्पस , गव्हातील मावा कीटक , भेंडीवरील मावा , तुडतुडे व पांढ – या माशा , राई वरील मावा कीटक , टोमॅटो वरील पांढ – या माशा , वांग्या वरील पांढ – या माशा व तुडतुडे ( पानांवरील फवारणी ) , चहावरील टी मॉस्कयुटो ( चहावरील डास ) किडा , बटाट्या वरील मावा ( पानांवरील फवारणी व माती कीटकनाशकांने ओलीचिंब करणे ) , सिट्रस ( लिंबू वर्गातील फळांमधील ) सायलिंड्स या सर्वाच्या नियंत्रणासाठी एक्टारा २५ डब्ल्यूजीची शिफारस करण्यात येते .

एक किलोग्रॅम उत्पादनामध्ये २५० ग्रॅम ( डब्ल्यूडब्ल्यू ) इतक्या प्रमाणात थायामेथॉक्याम् हा क्रियाशील घटक असतो .

वापरासंबंधी सूचना ;

आवश्यक तितकी कीटकनाशकाची मात्रा मोजून घ्या व ती थोड्या पाण्यात नीट मिसळा . उरलेले पाणी नंतर घालून व्यवस्थित ढवळा , सोयिस्कर फवारणी यंत्राने पिकावर संपूर्ण आच्छादक फवारणी करा .

१ दक्षता :

१ . अन्नपदार्थ , अन्नपदार्थाचे रिकामे डबे व पशुखाद्ययापासून दूर जागी ( तणनाशके ) ठेवावीत . तोंड , डोळे व त्वचेशी संपर्क येऊ देऊ नये . फवारणीच तुषार श्वासावाटे शरीरात जाऊ देऊ नयेत . वान्याच्या दिशेने फवारणी करावी . फवारणी केल्यानंतर खराब झालेले कपडे व शरीराचे अवयव संपूर्णपणे स्वच्छ धुवावेत . फवारणी करत असता काही खाऊपिऊ नये , चघळू किंवा चावू नये .मिश्रण व फवारणी करताना संपूर्ण संरक्षक कपडे वापरावेत . विषबाधेची लक्षणे : विषबाधेमुळे उत्स्फूर्त हालचालींमध्ये घट , स्नायूंना झटके व अवयवाची स्थानभ्रष्टता वगैरे लक्षणे उद्भवू शकतात

प्रथमोपचार :

गिळले गेले असल्यास घशात बोटे घालून उलटी काढावी वांती स्वच्छ होईपर्यंत पुन : पुन्हा उल्टी काढावी . रुग्ण बेशुद्ध पडलेला असल्यास उलटी काढूनये . * २ . कपडे व त्वचा दूषित झाली असल्यास ते कपडे काढून टाकावेत व बाधित त्वचा भरपूर साबण व पाण्याने धुवावी . ३ . डोळे बाधित झाले असल्यास भरपूर खारट पाण्याने स्वच्छ पाण्याने १० ते १५ मिनिटे स्वच्छ धुवावेत . ४ . श्वासावाटे शरीरात गेले असल्यास रुग्णाला ताज्या हवेत हलवावे . उतारा : ठराविक असा उतारा ज्ञात नाही . लक्षणानुसार उपचार करावेत .

रिकाम्या डब्यांची विल्हेवाट

: १ , पॅकेजेस किंवा जादा साहित्य आणि मशीन्स धुतलेले पाणी आणि डबे याची विल्हेवाट पर्यावरण किंवा पाण्याचं प्रदूषण होणार नाही अशा प्रकारे केली पाहिजे ,

२ . पुनर्वापर टळावा म्हणून वापरलेली पॅकेजिस उघड्यावर टाकू नयेत .

३ . पॅकेजिस्मोडून – तोडून वस्तीपासून दूर पुरावीत ,

साठवण :

१ . कीटकनाशकाची पॅकेजिसू मूळ कंटेनर्समध्ये स्वतंत्र खोल्या अगर वास्तूंमध्ये , इतर वस्तू विशेषतः खाद्य – पदार्थ साठविण्याच्या खोल्या अगर वस्तूंपासून दूर , अगर स्वतंत्र कपाटांमधून कडीकुलुपात ठेवावीत . २ . कीटकनाशके साठवण्याच्या खोल्या अगर वास्तू पक्क्या बांधणीच्या , कोरड्या , भरपूर प्रकाशाच्या व खेळत्या हवेच्या तसेच कीटकनाशकाच्या वाफेचा संसर्ग होऊ नये म्हणून पुरेशा मोजमापाच्या असाव्यात .

महत्वाचे घटक

थायामेथाँक्झाम25%wg

About the author

Sachin

Hay my name is sachin this is my blog allcustomersupport.in please support us YouTube Instagram Facebook Twitter blogger WordPress tips &, tricks

Thank you

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.